October 27, 2025 7:49 PM

views 26

जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवायला हवं-एस जयशंकर

जागतिक स्थैर्य आणि शांततेला सर्वात जास्त धोका दहशतवादापासून आहे, त्यामुळे जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवायला हवं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.  मलेशियातील क्वालालंपूर इथं २०  व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला ते आज संबोधित करत होते. दहशतवादाशी अजिबात तडजोड केली जाणार नाही असं सांगत जयशंकर यांनी जगातल्या सर्व देशांना दहशतवादाविरोधात मोहिम राबवण्याचं आवाहन केलं. सागरी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत भारत वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार जयशंकर यांनी केला. तसंच ...

October 24, 2025 3:05 PM

views 36

जागतिक स्तरावर आजच्या काळात सर्वसमावेशकता मजबूत होणं गरजेचं-डॉ. एस जयशंकर

जागतिक स्तरावर आजच्या काळात सर्वसमावेशकता मजबूत होणं गरजेचं असून संयुक्त राष्ट्रसंघानही त्याला पाठिंबा द्यायला हवा. असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाला ८० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज दिल्लीत त्यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. भारतानं शांतता आणि सुरक्षेला त्याचप्रमाणे प्रगती व विकासाला नेहमीच महत्त्व दिलं आहे. असंही ते म्हणाले.

October 7, 2025 12:21 PM

views 23

कृत्रिम बुद्दीमत्तेच्या अंमलबजावणीसाठी विश्वास आणि सुरक्षितता आवश्यक-एस. जयशंकर

कृत्रिम बुद्दीमत्तेची जबाबदारीने अंमलबजावणी करण्यासाठी विश्वास आणि सुरक्षितता आवश्यक असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘ट्रस्ट अँड सेफ्टी फेस्टिवल ऑफ इंडिया’ महोत्सवाला संबोधित करत होते.   आगामी काळात कृत्रिम बुद्दीमत्त्ता अर्थव्यवस्थांमध्ये परिवर्तन घडवेल, कामाच्या सवयी बदलेल, चांगल्या आरोग्यासाठी नवीन उपाय शोधेल आणि शिक्षणाची पोहोच वाढवेल, असं ते यावेळी म्हणाले. जीवनशैलीमधला कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला प्रभाव प...

May 23, 2025 9:00 PM

views 11

भारत-जर्मनी धोरणात्मक संबंध वाढवण्यावर दोन्ही देशांनी घेतली शपथ

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस.जयशंकर यांनी आज बर्लिन इथं जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली.  दहशतवादाविरोधात भारत देत असलेल्या लढ्यात जर्मनीनं दिलेल्या साथीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे त्यांचे आभार मानले. भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी मर्झ यांच्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं जयशंकर यांनी त्यांना सांगितलं.   जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र आणि सुरक्षा निती सल्लागार डॉक्टर गुंटर साउटर यांची भेट घेत चर्चा केली. द...

April 1, 2025 10:54 AM

views 12

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी नेदरलँडच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत घेतली भेट

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी नेदरलँडचे परराष्ट्र मंत्री कॅसफर वेल्दकँम यांची काल नवी दिल्ली इथं भेट घेतली. यावेळी दोनही देशांदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, संशोधन, पाणी, कृषी, आरोग्य, संरक्षण अशा विविध मुद्यावर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यामावरील संदेशांत म्हटलं आहे. भविष्यात सेमीकंडक्टर्स, हरितउर्जा, शिक्षण आणि प्रतिभावंतांची देवाणघेवाण या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. वेल्दकँम यांचं दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल आगमन झालं.

January 1, 2025 9:45 AM

views 10

हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूहाची भूमिका महत्त्वाची – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांचं मत

हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूह महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. क्वाडच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. तात्कालिक आपत्तीला प्रतिसाद देण्यातून निर्माण झालेला क्वाड समूह आता पूर्णवेळ भागीदारीत परिवर्तित झाला असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. क्वाड समूह आता एकमेकांसोबतच हिंद प्रशांत क्षेत्रात...

December 2, 2024 7:57 PM

views 15

आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवरच्या भागीदारीची गरज – डॉ. एस जयशंकर

आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात विविध पातळ्यांवर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होत असून त्यावर जागतिक पातळीवरच्या भागीदारीची गरज आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज तर्फे आज नवी दिल्लीत आयोजित भागीदारीविषयक परिषदेत ते बोलत होते. जगात सर्वच देशांना आव्हानं उभी राहत असून त्यावर एकेकट्यानं मात करणं अवघड आहे असं ते म्हणाले.    युक्रेन रशिया युद्ध, अमेरिका आणि चीन दरम्यानचा व्यापारी संघर्ष, चलनवाढ, आणि कर्ज अशा विविध घटनांमुळे निर्मा...

November 13, 2024 8:26 PM

views 16

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची चिंता व्यक्त

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदार परिषदेच्या राजकीय, सुरक्षा, सामाजिक आणि सांस्कृतिक समितीच्या दुसऱ्या बैठकीत ते नवी दिल्ली इथं बोलत होते. यावेळी सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान अल सौद हे उपस्थित होते. पश्चिम आशिया विशेषतः गाझापट्टीत निर्दोष नागरिकांच्या मृत्यूबद्दल जयशंकर यांनी यावेळी दुःख व्यक्त केलं. पॅलेस्टाईनच्या संघर्षावर द्विराष्ट्र संकल्पनेच्या तोड...