November 1, 2025 12:05 PM

views 33

भारत-इंग्लंड संबंध आता गतिमान आणि भागीदारीमध्ये विकसित झाले – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

भारत-इंग्लंड संबंध एका गुंतागुंतीच्या ऐतिहासिक संबंधापासून गतिमान आणि भविष्यकालीन भागीदारीमध्ये विकसित झाले असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीमध्ये यूके राष्ट्रीय दिन समारंभात ते बोलत होते.   दोन्ही देश कनेक्टिव्हिटी, एआय आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या बाबतीतही एकमेकांना आवश्यक ते सहकार्य करतअसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

July 19, 2025 1:27 PM

views 4

भारत कोणत्याही एकतर्फी निर्बंधंचं समर्थन करत नाही- परराष्ट्र मंत्रालय

भारत कोणत्याही एकतर्फी निर्बंधंचं समर्थन करत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं काल स्पष्ट केलं. गुजरातच्या वाडिनार इथं रॉसनेफ्टच्या रिफायनरीवर युरोपीय संघानं घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही भूमिका मांडली.   भारत एक जबाबदार देश असून कायद्याचं पालन करतो, असं ते म्हणाले. भारताच्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे, असंही जयस्वाल यांनी नमूद केलं. विशेषतः ऊर्जा व्यापाराबाबत दुटप्पी भूमिका असत...

January 13, 2025 2:30 PM

views 7

परराष्ट्र व्यवहार मंत्री आजपासून 3 दिवसांच्या स्पेन दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या स्पेनच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच स्पेन दौरा आहे. या भेटीदरम्यान ते स्पेनचे परराष्ट्रमंत्री मॅन्युएल अल्बरेस यांच्या बरोबर द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक तसंच दोनही देशांसाठी महत्वाच्या जागतिक मुद्यांवर चर्चा करतील. ते स्पॅनिश राजदूतांच्या ९ व्या वार्षिक परिषदेला संबोधित करतील तसंच भारतीय समुदायाशी संवाद साधतील.  

January 4, 2025 2:50 PM

views 4

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री डॉ. अब्दुल्ला खलील यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा

भारताच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ अब्दुल खलिल आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांच्या काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार आणि क्षेत्रातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी अर्थात सागर या तत्वानुसार भारताचे मालदीव सोबतचे संबंध अतिशय महत्वाचे असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत हा नेहमीच संकटकाळी मदत करणारा पहिला देश असून भारतानं मालदीवला कठीण प्रसंगी केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल खालिल यांनी आभार मानले. भारताच्या...

January 1, 2025 9:45 AM

views 7

हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूहाची भूमिका महत्त्वाची – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांचं मत

हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूह महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. क्वाडच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. तात्कालिक आपत्तीला प्रतिसाद देण्यातून निर्माण झालेला क्वाड समूह आता पूर्णवेळ भागीदारीत परिवर्तित झाला असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. क्वाड समूह आता एकमेकांसोबतच हिंद प्रशांत क्षेत्रात...

November 13, 2024 10:14 AM

views 9

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची आज सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत नवी दिल्लीत होणार बैठक

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री राजपुत्र फैसल बिन फरहान अल सौद यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक शतकांपासून मैत्रीपूर्ण आर्थिक तसंच सामाजिक सांस्कृतिक संबंध आहेत. भारत हा सौदी अरेबियाचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे तर सौदी भारताचा चौथ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे. दर वर्षी होणारी हज यात्रा हादेखील दोन्ही देशांमधला महत्त्वाचा दुवा असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.

October 15, 2024 1:45 PM

views 4

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज दोन दिवसीय दौऱ्यासाठी इस्लामाबादला रवाना होणार

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज दोन दिवसीय दौऱ्यासाठी इस्लामाबादला रवाना होणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री ९ वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये जात आहेत. या बैठकीदरम्यान पाकिस्तान सोबत कुठलीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचं जयशंकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. भारतासह इराण, कझाकस्तान, चीन, किर्गिज प्रजासत्ताक, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान हे ९ देश या संघटनेचे सदस्य आहेत.  

August 9, 2024 3:32 PM

views 15

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज मालदीवच्या ३ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधले परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. हिंद महासागर क्षेत्रात महत्वपूर्ण सामरिक भौगोलिक स्थान असलेला मालदीव हा भारताचा प्रमुख शेजारी देश आहे.