August 29, 2024 7:19 PM August 29, 2024 7:19 PM

views 6

मुंबईच्या वांद्रे टर्मिनसपासून मडगावला जाणाऱ्या नव्या एक्सप्रेस गाडीचं उद्घाटन

मुंबईच्या वांद्रे टर्मिनस पासून मडगावला जाणारी नवी एक्सप्रेस गाडी आजपासून सुरू झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली. या कार्यक्रमाला रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी विशेष गाडी असावी या स्थानिकांच्या मागणीवरून ही रेल्वे गाडी सुरू झाली आहे. यावेळी आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे नेते आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.   मुंबईत रेल्वेचे एकूण १६ हजा...