November 1, 2025 10:29 AM November 1, 2025 10:29 AM

views 147

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने येत्या फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. दोन्ही परीक्षा 18 मार्च रोजी संपतील.   प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारीपासून सुरू होतील. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेलं वेळापत्रक माहितीसाठी आहे; परीक्षेपूर्वी शाळा महाविद्यालयांकडे दिलं जाणारं छापील वेळापत्रकच अंतिम असेल; अन्य समाजमाध्यमांवर ...

June 2, 2025 8:16 PM June 2, 2025 8:16 PM

views 4

येत्या १५ तारखेला होणार असलेली NEET परीक्षा पुढं ढकलली

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या १५ तारखेला होणार असलेली NEET परीक्षा पुढं ढकलली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळानं याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. अधिक परीक्षा केंद्रं आणि पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्यासाठी परीक्षा पुढं ढकलली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.  

January 1, 2025 3:19 PM January 1, 2025 3:19 PM

views 18

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मार्चमध्ये या परीक्षांना सुरुवात होईल. या परीक्षांना १ लाख ३८ हजार विद्यार्थी बसणार असून त्याकरता ४३९ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे विषय, आसन क्रमांक आणि अनुषंगिक तपशीलाबाबतची तात्पुरती प्रवेशपत्रं महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असं विद्यापीठानं कळवलं आहे.

November 21, 2024 7:41 PM November 21, 2024 7:41 PM

views 45

दहावी आणि बारावीच्या परीक्षा जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च तर दहावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात घेतली जाणार आहे. तत्पूर्वी बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात घेतली जाईल तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत ह...

September 17, 2024 10:11 AM September 17, 2024 10:11 AM

views 9

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत असं आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं केलं आहे. ही परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी दोन सत्रात होणार आहे. सर्व शाळांमधल्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षण सेवक, शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. अधिक माहिती परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळवलं आहे.