May 19, 2025 12:06 PM May 19, 2025 12:06 PM
4
एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा
राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी नुकतंच माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं आहे. हवामान आणि प्रादेशिकतेच्या अत्यंत कठीण आव्हानांचा सामना करत या 18-19 वर्षांच्या छात्रांनी एव्हरेस्टवर तिरंगा आणि एनसीसीचा ध्वज फडकवला. सियाचीन इथल्या लष्कराच्या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेत एनसीसीच्या देशभरातल्या निवडक 15 छात्रांना गिर्यारोहणाचं बर्फाळ प्रदेशाबाबतचं आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यातील 10 छात्रांची या मोहीमेसाठी निवड करण्यात आली होती. नेपाळमधल्या शेर्पां...