December 12, 2025 2:54 PM December 12, 2025 2:54 PM
19
युरोप मधल्या शाळेत हिजाब किंवा बुरखा घालण्यावर बंदी
युरोप मधल्या ऑस्ट्रिया या देशानं १४ वर्षांखालच्या मुलींनी शाळेत हिजाब किंवा बुरखा घालण्यावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे. हा नियम सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये लागू होणार आहे. तरुण मुलींना सक्षम बनवून त्यांना अत्याचारांपासून मुक्त ठेवण्यासाठी हा नियम अमलात आणल्याचं ऑस्ट्रिया सरकारनं म्हटलं आहे.