August 10, 2024 7:43 PM August 10, 2024 7:43 PM
10
हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
हत्तीरोग निर्मूलनासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचं प्रत्येकाने सेवन करावं, असं आवाहन केंद्रीय आयुष कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. हत्तीरोग निर्मूलनासाठी द्वैवार्षिक सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन दूरदृष्य प्रणालीद्वारे जाधव यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. हत्तीरोग हा आजार कायमस्वरूपी असल्यानं दिव्यांगांचे लाभ मिळण्यासाठी बाधित रुग्णांना ४५ टक्के अपंगत्वाचं प्रमाणपत्र द...