September 24, 2024 10:07 AM September 24, 2024 10:07 AM

views 10

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जुलै महिन्यात २० लाख सदस्यांची वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्य संख्येत यंदाच्या जुलै महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे २० लाख सदस्यांची वाढ झाली आहे, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ २ पूर्णांक ४३ टक्के इतकी आहे. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. या वर्षीच्या जून महीन्यामध्ये १० लाख ५२ हजार नवीन सदस्यांनी नोंदणी केली असल्याचं दिसून आलं. १८ ते २५ वयोगटामध्ये ९ लाख इतकी सर्वाधिक वाढ दिसून आली. तर जुलैमध्ये तीन लाखांहून अधिक नवीन महिला सदस्यांनी कर्मच...

September 5, 2024 9:07 AM September 5, 2024 9:07 AM

views 14

पीएफ पेन्शन येत्या जानेवारीपासून कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून काढता येणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - ईपीएफओद्वारे देण्यात येणारी पेन्शन येत्या जानेवारीपासून देशभरातल्या कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळणार आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही घोषणा केली. ईपीएफओच्या ७८ लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे.

August 21, 2024 1:09 PM August 21, 2024 1:09 PM

views 5

EPFOमध्ये यावर्षी १९ लाख २९ हजार नवीन सदस्यांची नोंदणी

EPFO, अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत या वर्षी जूनमध्ये 19 लाख 29 हजार नवीन सदस्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत सदस्यसंख्येत 7 पूर्णांक 86 शतांश टक्क्यांनी वाढ झाली  आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयान आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. यात 18 ते 25 वयोगटातल्या सदस्यांची संख्या जास्त आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे. संघटनेच्या माहिती नुसार अंदाजे 14 लाख 15 हजार सदस्य बाहेर पडले होते आणि नंतर त्यांनी  पुन्हा सदस्यत्व घेतलं.

July 23, 2024 2:01 PM July 23, 2024 2:01 PM

views 11

अर्थसंकल्प २०२४ : भविष्य निर्वाह निधी धारकांसाठी विविध सवलतींची घोषणा

भविष्य निर्वाह निधी धारकांसाठी विविध सवलतींची घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केली. त्यानुसार पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या सर्व नोकरदारांच्या खात्यामध्ये एका महिन्याचा पगार जमा होईल. दर महिन्याला एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सुमारे २१ कोटी  युवकांना याचा फायदा होणार आहे. रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठीही त्यांनी काही आर्थिक सवलती जाहीर केल्या.    उत्पादन आणि सेवा क्षेत्रांना चालना देण्यासाठी येत्या पाच वर्षांत देशातल्या आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी युवकांना वर्षभरासाठी इंटर्नशिप...

July 20, 2024 8:44 PM July 20, 2024 8:44 PM

views 5

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यसंख्येत मे महिन्यात १९ लाख ५० हजारांची भर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यसंख्येत गेल्या मे महिन्यात १९ लाख ५० हजारांची भर पडली आहे. मे २०२४मधे नवीन ९ लाख ८५ हजार पगारदारांनी संघटनेचं सदस्यत्व घेतलं. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात नोंदल्या गेलेल्या सदस्यसंख्येच्या तुलनेत ही संख्या साडे अकरा टक्क्यांनी जास्त आहे.

June 14, 2024 8:24 PM June 14, 2024 8:24 PM

views 13

EPFO बहुतांश दावे ३ दिवसात निकाली काढणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना बहुतांश दावे ३ दिवसात निकाली काढत आहे. शिक्षण, आजार, विवाह तसंच घर खरेदीकरिता मागितलेल्या १ लाख रुपयांपर्यंतच्या हंगामी कर्जांचं वितरण करण्यासाठी नवीन स्वयं चलित प्रणाली सुरू केल्याची माहिती संघटनेनं दिली आहे. या माध्यमातून २५ लाख प्रकरणं मार्गी लागली आहेत. आजारपणासाठी घेतलेल्या कर्जांचे अर्ध्याहून अधिक अर्ज निकाली काढल्याचंही संघटनेनं कळवलं. केंद्रीय कामगार सचिव सुमिता दावरा यांनी आज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यासाठी आढा...