May 25, 2025 1:45 PM May 25, 2025 1:45 PM

views 11

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता केंद्र सरकारने गेल्या वर्षीप्रमाणेच ८.२५ टक्के दर जाहीर केला आहे. याचा लाभ देशातल्या सात कोटीपेक्षा जास्त पगारदारांना मिळत आहे. २०२२- २३ मधे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीतल्या ठेवींवर ८ पूर्णांक १५ शतांश टक्के व्याज मिळत होतं. गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफओ ने सुमारे २ कोटी १६ लाख रुपयेपर्यंतचे दावे निकाली काढले. ही आजवरची सर्वाधिक रक्कम आहे.