August 9, 2024 3:41 PM

views 12

देशाच्या लोह खनिज उत्पादनात सुमारे ९ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ

देशाच्या खनिज उत्पादनात वाढ झाली असून २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत लोह खनिज उत्पादनात सुमारे ९ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ नोंदली गेली. चुनखडीच्या उत्पादनात १ पूर्णांक ८ दशांश टक्के वाढ नोंदली गेली. तर चुनखडीचं उत्पादन साडेचारशे मेट्रिक टन झालं होतं. मँगनीज उत्पादन ११ टक्क्यांनी वाढलं आहे.  

June 28, 2024 8:31 PM

views 11

ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या १०व्या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव उपस्थित

जागतिक पर्यावरणासमोरच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शाश्वत जीवनशैली महत्वाची असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या १० व्या बैठकीला ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीच्या सुरुवातीला केनियामध्ये झालेल्या पर्यावरण परिषदेत शाश्वत जीवनशैलीचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यावर अंमलबजावणी केली जावी, असा आग्रह यादव यांनी या बैठकीत केला.   भारताने पर्यावरणासमोरची आव्हानं पेलण्यासाठी ठोस पावलं उ...