September 16, 2024 2:09 PM September 16, 2024 2:09 PM
13
फ्रान्समधून इंग्लिश खाडी मार्गे इंग्लंडकडे निघालेली नाव उलटल्याने आठ जणांचा मृत्यू
फ्रान्समधून इंग्लिश खाडी मार्गे इंग्लंडकडे निघालेली नाव काल रात्री उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. या रबरी नावेत ६० प्रवासी होते. त्यात आयरिट्रिया, सुदान, सीरिया आणि इराणच्या नागरिकांचा समावेश आहे. फ्रेंच आणि ब्रिटिश सरकार मदत आणि बचावकार्य करीत आहे. साधारण पंधरवड्यापूर्वी इंग्लिश खाडीत अशाच एका अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ६ लहान मुलं आणि एका गर्भवती महिलेचा समावेश होता.