September 15, 2024 7:14 PM September 15, 2024 7:14 PM

views 11

अभियंता दिनानिमित्त नागपूरमध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान

अभियंता दिनानिमित्त आज नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उत्‍कृष्‍ट कार्य करणारे अभियंते, वास्‍तुशास्‍त्रज्ञ, अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा सत्‍कार करण्‍यात आला, तसंच उत्‍कृष्‍ट प्रकल्‍प पुरस्‍कार देखील वितरीत करण्‍यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागात देश उभारणीची मोठी ताकद असल्याचे गौरवोद्गार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी काढले. 

September 15, 2024 2:45 PM September 15, 2024 2:45 PM

views 18

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

आज अभियंता दिन, देशाचे महान अभियंता सर एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची प्रगती, नवनिर्मिती आणि नव्या आव्हानांचा सामना करण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.