October 24, 2025 2:47 PM October 24, 2025 2:47 PM

views 6

देशात १० कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं लक्ष्य- मनोहरलाल

देशात १० कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं असून आतापर्यंत त्यातील १ कोटी मीटर बसवण्यात आल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल यांनी म्हटलं आहे. ते आज हरियाणातल्या रोहतक इथं बोलत होते. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना आपल्या तक्रारी थेट करता येतील. त्याचप्रमाणे ते आपला वीजेच्या वापर नियंत्रित करुन वीज वाचवू शकतील. असंही ते म्हणाले.

May 13, 2025 7:23 PM May 13, 2025 7:23 PM

views 3

देशातलं ऊर्जाक्षेत्र भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं-ऊर्जामंत्री

देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी देशातलं ऊर्जाक्षेत्र आधुनिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं, असं मत केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांनी आज मांडलं. पश्चिम प्रभागातल्या राज्यांच्या स्थानिक ऊर्जा परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. अशा स्थानिक परिषदांमुळे त्या त्या ठिकाणच्या समस्या सोडवायला मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०४७पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय आणि सहकार्य असणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. म...