June 29, 2024 10:11 AM

views 28

केंद्र सरकारकडून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेतील तरतुदींमध्ये बदल

केंद्र सरकारनं कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेतील तरतुदींमध्ये बदल केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा सहा महिन्यांपेक्षा कमी राहिली आहे, त्यांनाही या योजनेतील विथड्रॉअल बेनिफिट म्हणजे रक्कम काढण्याची सुविधा त्यामुळे मिळणार आहे. सेवा पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा कमी काळ असताना या योजनेतून बाहेर पडणाऱ्या सात लाख कर्मचाऱ्यांना या बदलांचा फायदा होणार आहे.