November 3, 2025 2:44 PM November 3, 2025 2:44 PM
38
भारत तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक नसून प्रगतीचा प्रणेता बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक नाही तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रणेता बनला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीमध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. देशात नवोन्मेषाची परिसंस्था निर्माण व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असून जगातली सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा भारतात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात त्यांनी देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्...