June 24, 2025 1:28 PM June 24, 2025 1:28 PM
2
लष्करासाठी तातडीच्या खरेदी यंत्रणेअंतर्गत १,९८१ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी
संरक्षण मंत्रालयानं लष्करासाठीच्या तातडीच्या खरेदी यंत्रणेअंतर्गत १३ करारांना अंतिम स्वरूप दिलं असून, एकूण १,९८१ कोटी रुपयांची खरेदी केली जाणार आहे. याअंतर्गत एकात्मिक ड्रोन वेधक प्रणाली, हलक्या वजनाचे रडार, कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीसाठीचे प्रक्षेपक आणि क्षेपणास्त्रे, बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि रायफल्ससाठी रात्रीच्या दृष्यमानतेच्या उपकरणांची खरेदी केली जाणार आहे. दहशतवादाविरोधात सैनिकांना परिस्थितीची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, वेगवान हालचाली आणि घातकता वाढावी तसंच संरक्षणात वृद्...