December 20, 2025 1:36 PM December 20, 2025 1:36 PM

views 39

राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ७ हत्तींचा मृत्यू

आसाम राज्यात सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसनं हत्तींच्या कळपाला धडक दिल्यानं सात हत्तींचा मृत्यू झाला असून यात एक हत्ती जखमी झाला आहे. होजई जिल्ह्यात आज पहाटे सव्वा दोन वाजता ही घटना घडली. या अपघातात राजधानी एक्सप्रेसचं इंजिन आणि ट्रेनचे  पाच डबे रुळावरून घसरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात एकही रेल्वे प्रवासी जखमी झालेला नाही.  गुवाहाटी पासून सुमारे १२६ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला असून धुक्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं  नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य प्रवक...

April 4, 2025 2:40 PM April 4, 2025 2:40 PM

views 16

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापन करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापन करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातल्या संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यानी दिल्या.   तिलारी प्रकल्पाच्या संरक्षित भागात या हत्तींच्या उपजीविकेसाठी बांबू, केळी, फणस अशी झाडं लावावीत. हत्तींचा वावर असलेल्या परिसरात रेल्वे रुळांच्या बाजूनं कुंपण घालावं, ...

September 15, 2024 3:41 PM September 15, 2024 3:41 PM

views 16

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाकडून पिकांची नासधूस

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाने पिकांची नासधूस केल्याने भातशेतीचं नुकसान झालं आहे. या कळपात २८ रानटी हत्ती असून ते कुरखेडा, आरमोरी, शंकरनगर, पाथरगोटा या भागात त्यांनी नुकसान केलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई देण्यात येईल, असं वनविभागाने म्हटलं आहे. हे हत्ती सध्या वैरागड परिसरात चुनबोडीच्या जंगलात गेले असून ते पुढे पोर्ला परिसरात जाऊ शकतात, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.