July 19, 2024 3:24 PM July 19, 2024 3:24 PM

views 29

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती क्षेत्रात २०३० पर्यंत भारताचा व्यापार पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती क्षेत्रात २०३० पर्यंत भारताचा व्यापार पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं नीती आयोगानं म्हटलं आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी काल नवी दिल्लीत ‘इलेक्ट्रॉनिक्स वैश्विक मूल्य साखळीत भारताची भागीदारी’ हा अहवाल प्रसिद्ध केला, त्यात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   २०२३ मध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात भारताचा व्यापार १०१ डॉलर्सने वाढला. यामध्ये मुख्यतः देशी मोबाइल उत्पादनाचा सर्वात जास्त वाटा असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.