June 27, 2025 10:07 AM June 27, 2025 10:07 AM
12
राज्यात वीजदरात टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26 टक्के कपात होणार, सुधारित दर येत्या 1 जुलैपासून लागू
राज्यात प्रथमच वीजग्राहकांना दरकपात मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. वीजदरकपात करण्यासाठी महावितरणनं केलेल्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगानं दिलेल्या निकालानुसार, वीजदरात टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26 टक्के कपात केली जाईल. सुधारित दर येत्या 1 जुलैपासून लागू होतील. पहिल्या वर्षी 10 टक्के कपात होणार आहे. भविष्यातल्या वीज खरेदीत सौर ऊर्जा आणि हरित ऊर्जेवर भर दिल्यामुळे वीजखर्चात बचत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरमहा 10 युन...