September 15, 2025 9:03 PM September 15, 2025 9:03 PM

views 8

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडे-दर जाहीर

राज्य सरकारनं राज्यात सेवा पुरवणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडे-दर जाहीर केले आहेत. या निर्णयानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी प्रवासाचा पहिला टप्पा दीड  किलोमीटरचा राहणार असुन प्राथमिक भाडं  १५ रुपये असणार आहे. त्यानंतरच्या किलोमीटर प्रवासासाठी १० रुपये २७ पैसे प्रमाणे भाडे आकारलं  जाणार आहे. ही सेवा पुरवण्यासाठी उबेर, रॅपिडो आणि ओला यांची निवड सरकारनं केली आहे. सध्या त्यांना केवळ मुंबई महानगर क्षेत्रात सेवा पुरवता येईल.