December 9, 2025 8:20 PM December 9, 2025 8:20 PM
11
निवडणूक यंत्रणेत सुधारणा करण्याची सरकारची इच्छा नसल्याचा राहुल गांधी यांचा आरोप
निवडणूक यंत्रणेत सुधारणा करणं फार सोपं आहे, पण सरकारला ते करायचं नाही, असा आरोप लोकसभेतले विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. लोकसभेत निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. निवडणुकीपूर्वी एक महिना आधी मतदार याद्या राजकीय पक्षांना द्याव्यात, मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याबाबतचा कायदा रद्द करावा, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची रचना कशी आहे, हे बघू द्यावं आणि निवडणूक आयुक्त पदावर असताना त्यांना कायद्यापासून संरक्षण देणारा कायदा मागे घ्यावा, अशा चार मागण्या त्यांनी सभागृहासमोर ...