October 1, 2024 10:51 AM

views 11

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत, सुरळीतपणे पार पडावी यासाठी राज्यातील सात जिल्ह्यातील ४० मतदार संघात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संध्याकाळी ६ पर्यंत मतदानाची वेळ आहे. सर्व मतदान केंद्र प्राथमिक सोयीसुविधांनी सुसज्ज असून २० हजारांहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये ५ हजार ६० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात ३९ लाखाहूंन अधिक मतदार ...

July 8, 2024 1:04 PM

views 14

फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर

फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले असून यानुसार न्यू पॉप्युलर फ्रंट ही डावी आघाडी १७५ ते २०५ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयाला येत आहे, तर इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या नेतृत्वाखालची मध्यममार्गी एन्सेम्बल अलायन्स दीडशे ते १७५ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. फ्रान्समधली अति उजवी आघाडी - नॅशनल रॅली तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. ही आघाडी ११५ ते दीडशे जागा जिंकेल. कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नसून त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.    मतदानाच्या य...

July 5, 2024 7:35 PM

views 29

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार हे आज स्पष्ट झालं. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आता १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.   भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवत आहेत....

June 13, 2024 9:10 PM

views 93

राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून येण्याचा सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा

राज्यसभा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडून येण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याशिवाय इतर कुणीही अर्ज भरलेला नाही. उद्या अर्जाची छाननी होईल, त्यानंतर त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होऊ शकते.  प्रफुल्ल पटेल यांनी कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बुधवारी रात्री त्यांच्या नावावर सहमती झाली, त्यांच्या उमेदवारीव...