August 5, 2025 7:43 PM

views 1.1K

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असून ती पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी सुरू असून प्रभाग रचना, मतदार याद्या या सर्व प्रकारच्या कार्यवाहीला वेळ लागणार आहे. त्यामुळं या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.   नाशिक विभागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्व तयारीचा त्यांनी...

July 11, 2025 8:20 PM

views 56

महानगरपालिका निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या तपासणीला सुरूवात

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करावी ती मतदानासाठी सज्ज करावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ...

May 15, 2025 7:32 PM

views 72

महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात महानगरपालिका निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यम प्रतिनिधीना सांगितलं. या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार असून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असं ते म्हणाले.    मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यसरकार लौकरच आपली भूमिका न्यायालयात मांडेल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रशासकीय सुधारणा आणि कार्यक्षमता वाढीच्या उद्देशाने राज्यशास...

February 4, 2025 1:37 PM

views 13

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एक कोटी ५६ लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

January 22, 2025 8:19 PM

views 33

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रला पुरस्कार

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्रासोबत जम्मू आणि काश्मिर तसंच झारखंडलाही पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी, राष्ट्रीय मतदार दिनी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जातील.   राज्यस...

November 29, 2024 8:29 PM

views 23

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवर जनतेच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

ओदिशा पाठोपाठ, हरियाणा, आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय हा लोकांचा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवरचा विश्वास दर्शवतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर असून आज भुवनेश्वरमध्ये बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ त्यांची एक सभा झाली. केंद्रातलं भाजपा सरकार ओदिशाला प्राधान्य देत असून ओदिशामध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यावर लगेच महिलांसाठी सुभद्रा योजनेसारखी अनेक मोठी पावलं उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधक...

November 15, 2024 8:26 PM

views 31

श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती दिसा नायके यांच्या नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाला स्पष्ट बहुमत

श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षानं संसदीय निवडणुकांमध्ये पुन्हा बहुमताचा आकडा पार केला आहे. संसदेतल्या २२५ पैकी १५९ जागा या डाव्या आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रपती दिसा नायके यांना संसदेचं मजूबत पाठबळ मिळालं आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलवेगाया या सजित प्रेमदासा यांच्या पक्षाला ४० जागा मिळाल्या आहेत. माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या न्यू डेमॉक्रेटिक फ्रंटला केवळ ५ जागा मिळाल्या आहेत.

November 14, 2024 8:17 PM

views 22

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान झालं असून, आज संध्याकाळी मतमोजणीही सुरु झाली. प्रथम टपाली मतदानाची मोजणी होत असून, त्याची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, तर अंतिम निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे, असं श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं सांगितलं.  या निवडणुकीत २२५ जागांसाठी ८ हजार ८०० उमेदवार रिंगणात होते.

November 13, 2024 9:22 AM

views 21

देशातल्या 11 राज्यातील 33 विधानसभा जागांसाठी तसेच वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

देशातल्या 11 राज्यातील 33 विधानसभा जागांसाठी तसच केरळ मधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राजस्थानमधल्या ७ , पश्चिम बंगाल ६ , आसाम ५, बिहार ४, कर्नाटकमधल्या ३ तर मध्यप्रदेश आणि सिक्कीम मधल्या 2 विधानसभा जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. तसंच केरळ, छत्तीसगड, गुजरात आणि मेघालय मधील विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेवरील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

October 6, 2024 3:37 PM

views 23

सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणूका जाहीर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रवर्गातल्या संचालकांच्या १८ पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशपत्रं स्वीकारली जाणार आहेत. १४ ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार असून त्यानंतर २९ ऑक्टोबरला ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. मतदान१० नोव्हेंबरला होणार असून ११ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.