October 15, 2024 7:39 PM

views 39

नांदेड आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीचा मार्ग मोकळा

वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात तसंच राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडमधल्या केदारनाथ विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळापत्रकानुसार निवडणूक होईल. इतर ठिकाणी १३ नोव्हेंबरला मतदान होईल.