August 12, 2025 3:38 PM August 12, 2025 3:38 PM
7
मनसेच्या प्रतिनिधी मंडळाची निवडणूक आयोगाला भेट
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. प्रभाग पद्धत नको, एक वॉर्ड एक उमेदवार अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवावी तसंच मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅटचा वापर करावा, अशी मागणी त्यांनी केली. पालिका निवडणुकीआधी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम तातडीने राबवण्याची मागणी आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.