December 20, 2025 2:57 PM
36
राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान
राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी, तसंच विविध नगरपंचायतींमधल्या १४३ सदस्य-पदांसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. सकाळी साडेसातला मतदान सुरुवात झाली असून साडेपाचपर्यंत ते सुरू राहणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत साडे ३७ टक्क्यापेक्षा जास्त, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी जवळपास ४६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पालघर नगर परिषदेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत ४० टक्के, तर वाडा नगरपंचायतीसाठी ३९ टक्के मतदान झालं...