December 19, 2025 8:08 PM December 19, 2025 8:08 PM

views 7

राज्यातल्या २९ महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

राज्यातल्या २९ महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची आपली तयारी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मांडली.    तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत निवडणूक लढायचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यांचे समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं...

December 15, 2025 7:13 PM December 15, 2025 7:13 PM

views 49

निवडणुकीचं बिगुल वाजलं, ‘या’ दिवशी होणार मतदान

राज्यातल्या सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेनंतर सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.   राज्यभरातल्या २९ महापालिकांमधल्या एकंदर २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होईल. त्यापैकी १ हजार ४४२ जागा महिलांसाठी, ७५९ ओबीसींच्या, ३४१ अनुसूचित जमातींसाठी आणि ७७ जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. मुंबई महानगरपालिका नि...

December 15, 2025 6:52 PM December 15, 2025 6:52 PM

views 13

‘अंतिम याद्यांमधलं त्रुटींचं निराकरण होत नाही, तोवर निवडणुका नकोत’

महानगरपालिकेसाठीच्या निवडणुकांची अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होऊन त्यातल्या त्रुटींचं निराकरण होत नाही, तोपर्यंत निवडणुकांची घोषणा होऊ नये, अशी मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वार्ताहर परिषदेत केली होती.    महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपा आणि महायुतीनं केलेल्या घोषणा फसव्या आहेत. पागडीमुक्त मुंबई आणि पोलिसांसाठी घरांसंदर्भातल्या योजनांना फसू नका, असं ते म्हणाले.