January 5, 2026 8:15 PM January 5, 2026 8:15 PM

views 19

महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेची न्यायालयात धाव

महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणुकांमध्ये ६८ ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडणुकीला स्थगिती द्यावी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या अर्ज माघारीची न्यायालयीन चौकशी करावी असं मनसेनं या याचिकेत म्हटलं आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही याचिका दाखल केली आहे.

January 3, 2026 8:36 PM January 3, 2026 8:36 PM

views 441

Municipal Election : महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं आज दिली. २९ महापालिकांमधल्या २ हजार ८६९ प्रभागांमधून हे उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी एकंदर ३३ हजार ४२७ अर्ज आले होते. त्यातले २४ हजार ७७१ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ८ हजार ८४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. आज सकाळी चिन्ह वाटप करुन अंतिम उमेदवार यादी आज प्रसिद्ध झाली आहे.    राज्यात सर्वाधिक १ हजार ७०० उमेदवार मुंबई महापालिकेच्या रिंगणात आहे. ...