December 22, 2025 8:38 PM December 22, 2025 8:38 PM
15
महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरायला सुरूवात
राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. या सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.