December 31, 2025 4:27 PM
102
महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या नामांकन अर्जांची छाननी
महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या अर्जांच्या छाननीला सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. २ जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ११ हजार ३९२ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले असून त्यापैकी २ हजार ५१६ अर्ज दाखल झाल्याचं राज...