December 1, 2025 8:43 PM December 1, 2025 8:43 PM

views 77

Maharashtra: नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान

राज्यातल्या २२२ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री १० वाजता संपेल. आज दिवसभर विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. या निवडणुकीचं मतदान उद्या, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. या मतदानासाठी उद्या, २ डिसेंबर रोजी संबंधित ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे.    दरम्यान, राज्यात एकंदर २४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आणि १५४ सदस्यपदांसाठी येत्या २० डिसेंबर रोजी...