December 20, 2025 7:48 PM December 20, 2025 7:48 PM

views 38

नगर परिषदा आणि नगर पंचायतींची उद्या मतमोजणी

राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी, तसंच विविध नगरपंचायतींमधल्या १४३ सदस्य पदांसाठी आज शांततेत मतदान झालं. निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली. अहिल्यानगरमध्ये दुपारी साडेतीनपर्यंत ५० पूर्णांक २५ शतांश टक्के मतदान झालं. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत नगरपरिषदेसाठी ५६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बुलडाणा जिल्ह्यात, देऊळगाव राजा ३६ पूर्णांक २३ शतांश, जळगाव जामोद जवळपास ४६ टक्के, खामगा...