January 22, 2026 3:41 PM
38
महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर
महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत मंत्रालयात जाहीर झाली. त्यानुसार १७ महानगरपालिकांमधे महापौरपद अनारक्षित राहील. या १७ पैकी मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, मीरा भाईंदर, मालेगाव, नांदेड-वाघाळा आणि धुळे या ९ ठिकाणी महापौरपद खुल्या प्रवर्गातल्या महिला उमेदवारांसाठी असेल. तर छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, सांगली-मिरज-कुपवाड, परभणी, अमरावती, सोलापूर, वसई-विरार आणि भिवंडी निजामपूर खुल्या प्रवर्गासाठी आहे. पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर आणि उल्हासनगर महानगरपा...