November 4, 2024 8:18 PM

views 21

अमेरिकेत उद्या अध्यक्षपदासाठी मतदान

अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी साडे पाच ते साडे नऊ दरम्यान मतदान होईल. मतदान बंद होताना निवडणुकीचे निकाल अपेक्षित असले तरी याचा अंतिम निर्णय काही दिवसानंतर होईल. तत्पूर्वी टपाली मतदानाने अनेकांनी आपलं मत आधीच नोंदवलं आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यात ही लढत होईल. या दोघांनीही निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या राज्यांमध्ये जोरदार प्रचार केला ...

October 18, 2024 3:21 PM

views 27

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.या काळात कुठंही गैरप्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन सज्ज आहे. रायगडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली.या कारवाईत एकूण २ लाख ७१ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

October 16, 2024 3:12 PM

views 14

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात

  राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जाहीर केला. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.        वाशिम जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काल वार्ताहर परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देण्यात आली. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी जाहिरात फलक हटवावेत तसंच नियमांचं काटोकोर पालन करावं  असे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.        अकोला जिल्ह्यात निवडणूक मुक्त वातावरणात व्हावी ...

July 26, 2024 1:18 PM

views 16

श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होणार

श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं १५ ऑगस्टपर्यंत यासाठी अर्ज मागवले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे ५ लाख मतांनी विजयी झाले होते. मात्र त्यानंतर आलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटामुळं त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी संसदेनं रानिल विक्रमसिंघे यांना राष्ट्रपतीपदासाठी निवडून दिलं होतं.

July 1, 2024 1:45 PM

views 20

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या तीन मतदार संघांची मतमोजणी नवीमुंबईत नेरुळ इथं होत असून मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा इथं मतमोजणी सुरू असताना एका मतदान केंद्रावर तीन मतपत्रिका जास्त निघाल्यानं गोंधळ उडाला. त्यामुळे संबंधित केंद्रावरची मतमोजणी स्थगित झाली आहे.

July 1, 2024 9:00 AM

views 12

विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची आज मतमोजणी

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी नाशिक शहरात केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी काल याठिकाणी पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.

June 29, 2024 10:30 AM

views 29

मंगोलियात सत्ताधारी पक्ष मंगोलियन पीपल्स पार्टीनं संसदीय निवडणुकीत विजय

मंगोलियात सत्ताधारी पक्ष मंगोलियन पीपल्स पार्टीनं संसदीय निवडणुकीत विजय मिळवला आहे. प्रारंभिक निकालांनुसार १२६ पैकी किमान ६८ जागा आपल्या पक्षाला मिळाल्या आहेत, असं पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधान ओयन एर्देन लुसानमस्राई यांनी वार्ताहरांना सांगितलं. कागदी मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर निवडणुकीचे अधिकृत निकाल जाहीर होतील. मंगोलियामध्ये संसदेचं एकच प्रतिनिधीगृह आहे.