November 22, 2025 3:40 PM
36
राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट
लातूरमध्ये ४ नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी ४४ तर सदस्य पदासाठी ६१४ जण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहे. लातुरमध्ये काल नगराध्यक्ष पदासाठीच्या एकूण १५ तर सदस्य पदासाठीच्या १०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. रत्नागिरी जिल्ह्यातही नगराध्यक्षपदांच्या सात, तर नगरसेवकपदांच्या ८४ अशा एकूण ९१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. धाराशिव मध्ये आता नगराध्यक्ष पदासाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठीच्या ३३ जणांनी अर्ज मागे घेतले. जिल्ह्यातल्या आठ नगरपालिकांसाठी आता...