October 21, 2024 3:15 PM October 21, 2024 3:15 PM
15
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होणार
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. याआधी महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी ६२ नावांची यादी काँग्रेस कार्यकारी समितीकडे सादर केली होती. तर झारखंडमध्ये जागावाटपाबाबत इंडिया आघाडीतले घटक पक्ष नाराजी व्यक्त करत आहेत. काँग्रेसच्या आजच्या बैठकीत या सर्व मुद्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, संयुक्त जनता दलाने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जमशेदपूर पश्चिम ...