March 18, 2025 3:44 PM March 18, 2025 3:44 PM

views 14

४८ तासांच्या आत मतदानाची बूथनिहाय आकडेवारी जाहीर करायला निवडणूक आयोग तयार

लोकसभेसाठी किंवा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदानाची आकडेवारी प्रत्येक बूथनुसार आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर  करावी, या मागणीचा विचार करायला आपण तयार आहोत, असं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी आयोगासमोर येत्या १० दिवसांत सादरीकरण करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. तृणमूल काँग्रेसच्या  खासदार महुआ मोईत्रा आणि एका सेवाभावी संस्थेनं यासंदर्भात दोन जनहित याचिका दाखल केल्या होत्या. यापुढची सुनावणी आता जुल...

January 22, 2025 9:08 PM January 22, 2025 9:08 PM

views 8

निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर

राज्यस्तरीय पातळीवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. उत्कृष्ट निवडणूक अधिकारी, उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतदानासाठी उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट मतदार सुविधा अशा विविध श्रेणींतर्गत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी नंदूरबार, लातूर, अकोला, गडचिरोली, हातकणंगले, मुंबई उत्तर पूर्वच्या  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झालेत. विधानसभेसाठी नवापूर, करवीर, पालघर, सिल्लोड, मलकापूर, ब्रह्मपुरी मतदारसंघाच्या ...

October 30, 2024 3:07 PM October 30, 2024 3:07 PM

views 15

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत. १५ ते २९ ऑक्टोबरपर्यंत सी-व्हिजिल ॲपवर एकूण १ हजार ६४८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातल्या १ हजार ६४६ तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथक चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाते.

October 23, 2024 2:18 PM October 23, 2024 2:18 PM

views 18

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ३८ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.   छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून, हसन मुश्रीफ कागलमधून, तर धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून, धर्मराव आत्राम यांना अहेरीतून, तर अदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे.

September 23, 2024 2:52 PM September 23, 2024 2:52 PM

views 9

निवडणूक आयोगाचं पथक २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर

निवडणूक आयोगाचं पथक २६ ते २८ सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. या काळात राज्यातले विविध राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोगाचं पथक बैठक घेणार  आहे. २८ सप्टेंबरला मुंबईत आयोगाची वार्ताहर परिषद होईल. यात राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.   

September 19, 2024 1:02 PM September 19, 2024 1:02 PM

views 14

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६१ टक्के मतदानाची नोंद

  जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३५ वर्षातल्या सर्वाधिक ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व २४ मतदारसंघात काल शांततेत मतदान झालं. किश्तवाड जिल्ह्यात सर्वाधिक ८० टक्के मतदानाची नोंद झाली आणि पुलवामामध्ये सर्वात कमी सुमारे ४७ टक्के मतदान झालं.   युवा आणि महिला मतदार मोठ्या संख्येनं या मतदानात सहभागी झाले होते. बहिष्कार आणि दहशतवादाला मतदारांनी मतदान यंत्रातून उत्तर दिल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी निवडणूक प्रक्रियेतल्या य...

September 5, 2024 1:24 PM September 5, 2024 1:24 PM

views 14

हरियाणा विधानसभा निवडणुकीची तसंच जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जम्मू काश्मीरच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसंच हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली.   जम्मू काश्मीरचा तिसरा टप्पा आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर असून १६ तारखेपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊन शकतील. तर जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जम्मू काश्मीर मध्ये १८ सप्टेंबर,   २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान निव...

August 31, 2024 7:58 PM August 31, 2024 7:58 PM

views 8

हरियाणा आणि जम्मू काश्मिर विधानसभेसाठी ४ ऐवजी ८ ऑक्टोबरला मतमोजणी

केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली असून हरियाणात आता १ ऑक्टोबर ऐवजी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिष्णोई समाजाच्या असोज अमावस्या उत्सावामुळे ही तारीख बदलण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे. अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी ही तारीख बदलण्याची विनंती केली होती. याबरोबरच जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आता ४ ऑक्टोबर ऐवजी  ८ ऑक्टोबरला करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

August 20, 2024 1:38 PM August 20, 2024 1:38 PM

views 10

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी

जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणूक आयोगानं आज अधिसूचना  जारी केली. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला  मतदान होणार असून त्यात पुलवामा, अनंतनाग, शोपियां, कुलगाम, रामबन, किश्तवाडा आणि डोडा जिल्ह्यांतील २४ विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं पम्पोर,त्राल,पुलवामा, राजपुरा, जैनापुरा, शोपिया,डी.एच. पोरा, कुलगाम, देवसर, दुरू,कोकेरनाग, अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्री गुफवाडा जीज बेहरा, शांगस-अनंतनाग पूर्व, पहलगाम, इंदरवाल, किश्तवाड, पद्दर-नागसेनी, भदरवाह, डोडा,...

August 17, 2024 10:36 AM August 17, 2024 10:36 AM

views 11

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करता येणार आहे. मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा मोबाईल क्रमांकही जोडता येणार आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा कालावधी निश्चित केला गेला आह...