December 15, 2025 7:14 PM December 15, 2025 7:14 PM

views 8

निवडणूक आयोगावर काँग्रेसची टीका

निवडणूक याद्या, दुबार मतदार आणि प्रभाग रचनेविषयी विरोधी पक्षांनी हरकती नोंदवल्या होत्या, मात्र निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातला सत्ताधारी पक्षाचा एक कार्यकर्ता प्रभाग रचना करत असल्याचं उघड होऊनही आयोगानं कारवाई केली नाही, असं सांगत महानगरपालिका निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष होणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

December 8, 2025 8:16 PM December 8, 2025 8:16 PM

views 15

पक्षाच्या घटनेची अद्ययावत प्रत सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या घटनेची अद्ययावत प्रत ३० दिवसांच्या आत सादर करावी, अशी सूचना निवडणूक आयोगानं आज केली. पक्षांची उद्दिष्टं आणि लोकशाही पद्धतीनं चालण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांची माहिती देणारा हा दस्तावेज महत्त्वाचा असून तो जमा करणं सर्व राजकीय पक्षांना बंधनकारक आहे, असं आयोगानं पक्षप्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. या घटना आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केल्या जातात.

December 6, 2025 11:59 AM December 6, 2025 11:59 AM

views 15

केरळमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण उपक्रमाच्या वेळापत्रकात एका आठवड्याने वाढ

निवडणूक आयोगाने केरळमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण उपक्रमाच्या वेळापत्रकात एका आठवड्याने वाढ केली आहे. 11 डिसेंबर रोजी संपणारा मतदार गणनेचा टप्पा आता 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहील, अशी माहिती आयोगाने काल दिली. सुधारित वेळापत्रकानुसार, मसुदा मतदार यादी 16 डिसेंबरऐवजी 23 डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रमासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

November 20, 2025 7:28 PM November 20, 2025 7:28 PM

views 19

मतदार यादी पुनरीक्षणाच्या दुसऱ्या टप्पात ५० कोटींहून अधिक अर्ज वितरित

नोव्हेंबर महिन्याच्या ४ तारखेला मतदार यादी पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून ५० कोटींहून अधिक गणना अर्ज वितरित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.   उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे १५ कोटी ३७ लाख गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये ७ कोटी ६४ लाखांहून जास्त अर्ज वितरित झाले आहेतय दुसऱ्या टप्प्यात नऊ राज्यं आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया सुरू केली असून पुढच्या महिन्यात ४ तारखेपर्यंत हा टप्पा सुरू राहील.

November 15, 2025 6:49 PM November 15, 2025 6:49 PM

views 22

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या रविवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार

  नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या, रविवारी देखील उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष भरता येतील तसंच ऑनलाईनही दाखल करता येणार आहेेत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. १७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम मुदत आहे.          दरम्यान, रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज १७ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. शिवसेनेकडून ९, भाजपा ५, प्रहार जनशक्ती पक्षाकडून एका आणि दोन अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज सादर केले. रत्नागिरी नगरपरिषदेत महायु...

November 13, 2025 8:01 PM November 13, 2025 8:01 PM

views 6.7K

उमेदवारी अर्ज आणि शपथत्रातली माहिती भरणं आवश्यक, कागदपत्र अपलोड करायची गरज नाही-निवडणूक आयोग

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज आणि शपथत्रातली माहिती भरणं आवश्यक असून त्यासोबत कोणतंही कागदपत्र अपलोड करायची गरज नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र यांच्या छापील प्रतीवर सही करून आवश्यक कागदपत्रांसह ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करावं असं निवडणूक आयोगानं सांगितलं. राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालीआहे. हे अर्ज maha s e c e l e c.in या संकेतस्थळावर भरायच...

November 8, 2025 6:25 PM November 8, 2025 6:25 PM

views 49

शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या तयार करायची प्रक्रिया सुरू

निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातले पदवीधर मतदारसंघ, तसंच पुणे आणि अमरावती विभागातल्या शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या नव्यानं तयार करायची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी नागरिकांना mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येतील. २५ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना १० सप्टेंबरपर्यंत त्यावर दावे आणि हरकती सादर करता येतील. अंतिम मतदार याद्या ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध ...

November 4, 2025 7:43 PM November 4, 2025 7:43 PM

views 2.1K

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींचं २ डिसेंबरला मतदान, मतमोजणी ३ डिसेंबर

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यानुसार येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून  उमेदवारी अर्ज भरता येणार असून १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. १८ नोव्हेंबरला उमेदवार अर्जांची छाननी केली जाईल, २१ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेता येईल तसंच २६ नोव्हेंबरला उम...

October 10, 2025 1:37 PM October 10, 2025 1:37 PM

views 173

मतदान करण्यासाठी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल – निवडणूक आयोग

मतदार यादीत नाव असलेल्यांना मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र किंवा इतर बारा पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. बिहार विधानसभा निवडणूक  तसंच इतर राज्यातल्या पोटनिवडणुकांच्या मतदारसंघात जवळपास सर्व  मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. असं  आयोगानं सांगितलं आहे. अंतिम  मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांमध्ये  सर्व नवीन मतदारांना ओळखपत्रे मिळतील अशी खात्री सगळ्या ठिकाणच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी करुन घ्यावी असे निर्दे...

October 9, 2025 3:17 PM October 9, 2025 3:17 PM

views 83

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात AIच्या गैरवापराबद्दल निवडणूक आयोगाचा इशारा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधातल्या उमेदवाराला   लक्ष्य बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करु नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश केला आहे. समाजमाध्यमांवर चुकीची, बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने देण्यावर बंदी घातली आहे. प्रचारातल्या चित्र, चित्रफीत अथवा ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असल्यास तसं लेबल त्यावर लावणं आवश्यक आहे. समाजमाध्यमावर सक्रीय असणाऱ्यांमुळे निवडणुकीचं वातावरण बिघडू नय...