January 11, 2026 5:46 PM

views 9

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा लाडक्या बहिणींचा वापर करून घेत आहे- विजय वडेट्टीवर

लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा लाडक्या बहिणींचा वापर करून घेत आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी आज अकोल्यात केली. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यावरूनही त्यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी भाजपाचीच भाषा बोलतात, असा आरोप त्यांनी केला.  

January 8, 2026 6:57 PM

views 15

अंबरनाथनगरपरिषदेमधे भाजपात गेलेल्या नगरसेवकांविरुद्ध काँग्रेस कायदेशीर पावलं उचलणार

भाजपामधे प्रवेश केलेल्या अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या बारा नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर पावलं उचलणार असल्याचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करणं किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं हे असंवैधानिक आहे, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असं सावंत म्हणाले.     अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांना पक्षप्रवेश दिल्यामुळे भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाल्याची टीका काँग्रेस प्र...

January 1, 2026 3:33 PM

views 241

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २ हजार ३४९ उमेदवारी अर्ज वैध

महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या छाननीत त्यातले १६७ अर्ज अवैध ठरले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९४६ अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या छाननीनंतर ११७ अर्ज अवैध ठरले तर ८३९ अर्ज वैध ठरले.   सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी एकूण १ हजार ४६० अर्ज दाखल झाले होते. छाननीत या अर्जांपैकी २३० अर्ज अवैध ठरले असून १...

December 21, 2025 8:39 PM

views 1.8K

नगरपालिका नगराध्यक्षपदांच्या निवडणूक निकालात भाजपाला सर्वाधिक जागा

राज्यातल्या २८८ नगरपालिका, आणि २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांच्या निकालात महायुतीतल्या घटक पक्षांनी सरशी साधली असून, भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही चांगलं यश मिळवलं, मात्र महाविकास आघाडीतल घटक पक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही.  तीन नगराध्यपदांसाठीच्या निवडणूका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. मतमोजणीची अधिकृत आकडेवारी अद्याप आयोगाकडून मिळाली नाही. मात्र आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी स्थानिक निवडणूक निकालांच्या बातम्या दिल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्...

December 21, 2025 8:41 PM

views 69

महाराष्ट्रात २८८ नगरपरिषदांच्या आणि २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु

राज्यातल्या २८८ नगरपरिषदांच्या आणि २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली आहे. तीन नगराध्यपदांसाठीच्या निवडणूका याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची गर्दी आहे. बीडमधे मतमोजणीच्या वेळी गोंधळ उडाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.  २ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत ६७ पूर्णांक ३ दशांश टक्के मतदान झालं तर २० डिसेंबरला झालेल्या टप्प्यात ४७ पूर्णांक ४ शतांश टक्के मतदारांनी आपला कौल यंत्रात बंद केला, असं राज्य निवडणूक आयोगाने...

December 12, 2025 3:09 PM

views 33

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढवण्याचा महायुतीचा निर्धार

आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते.   आगामी निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपली बैठक झाली, यात एकत्र लढण्याविषयी एकमत झाल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. जागावाटप स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरवलं जाईल, असं ते म्हणाले

December 12, 2025 10:40 AM

views 16

6 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण वेळापत्रकात सुधारणा

भारतीय निवडणूक आयोगानं सहा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. यामध्ये तमिळनाडु, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे आणि उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे.   ही राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मसुदा मतदार यादी या महिन्याच्या 16 तारखेला प्रकाशित केली जाईल. 6 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून विनंती मिळाल्यानंतर वेळापत्रकात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला अस...

December 11, 2025 4:01 PM

views 19

राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांबाबत चर्चा सुरू

 आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी चर्चेला सुरुवात केली. सर्व राजकीय पक्षांना समान संधी, पारदर्शकता आणि विश्वसनीयता या तीन कसोट्यांवर टिकणारी व्यवस्थाच जिवंत लोकशाही असते, मात्र या तिन्ही गोष्टींवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, असा आरोप त्यांनी केला. या विषयावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरू आहे.    तत्पूर्वी, वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्तच्या चर्चेचा समारोप सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी केला. वंदे मातरम हा देशाचा आत्मा जागृत करण्याचा मंत्र आणि देशाच्या पुनर्निर्...

November 30, 2025 7:48 PM

views 155

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोर

राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला २ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. तसंच प्रशासनाकडून २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू असून काही ठिकाणी टपाली मतदानाला सुरुवात होत आहे.   बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातल्या बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी आणि अंबाजोगाई या सहा नगरपरिषदांमधे दोन तारखेला मतदान होणार आहे. परळी नगरपरिषदेतले दोन नगर...

November 22, 2025 7:00 PM

views 55

पालघर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काल अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून उमेदवार आणि पक्षांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये झालेल्या सभेत केलं. शिंदे यांनी डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा इथं आज जाहीर सभा घेतल्या. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आह...