October 31, 2025 6:50 PM October 31, 2025 6:50 PM
18
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र एकता दौड, पदयात्रांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केलं. तसंच दिवंगत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नवी मुंबईत बेलापूर, रबाळे आणि नवी मुंबई महापालिका मुख्यालय इथं एकता दौडसह विविध कार्यक्रम आयोजित केले होते. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर इथल्या एकता द...