January 11, 2025 3:50 PM January 11, 2025 3:50 PM

views 11

मेट्रो लाईन ७ आणि २एसाठी मिळालेली नियमित मंजुरी MMRDA च्या वचनबद्धतेचा दाखला- उपमुख्यमंत्री

मुंबई मेट्रो लाईन ७ आणि २ए या दोन्ही मार्गांवर पूर्ण गतीनं संचालनासाठी सीसीआरएस, अर्थात रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तां कडून सुरक्षा प्रमाणपत्र आज प्रदान करण्यात आलं. त्यामुळे ५० ते ६० किमी प्रति तास या मर्यादित वेगाऐवजी आता ८० किमी प्रति तास या पूर्ण क्षमतेनं मेट्रोचं संचालन होईल.   मेट्रो लाईन ७ आणि २ए साठी मिळालेली नियमित मंजुरी हे मुंबईला कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसह जागतिक दर्जाचं शहर बनवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मेट...

December 21, 2024 7:24 PM December 21, 2024 7:24 PM

views 11

मार्चपर्यंत राज्याला नक्षलवादमुक्त करण्याचा मानस – एकनाथ शिंदे

राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी महायुतीचं सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली. ते आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते.    महायुतीच्या काळात गुन्हे उघडकीला येण्याचे प्रमाण वाढले, विकास आणि कल्याणकारी योजनांना वेग मिळाला, विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये उद्योग, रोजगार आणि सिंचनाच्या सुविधा वाढल्या असं ते म्हणाले.    मुंबईत दादर इथं इंदूमील मधल्या भारतरत्न डॉ. बा...

December 19, 2024 3:33 PM December 19, 2024 3:33 PM

views 22

विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे-एकनाथ शिंदे

महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.   गेल्या अडीच वर्षात राज्याच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन महाराष्ट्र समृद्ध करण्याचं आहे. त्यासाठी आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. एकाही पा...

November 26, 2024 8:02 PM November 26, 2024 8:02 PM

views 7

महाराष्ट्रात सरकारस्थापनेची अद्याप प्रतिक्षा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा दिला. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं शिंदे यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पहावं असं राज्यपालांनी  एकनाथ शिंदे यांना सांगितलं. आता नवनिर्वाचित आमदारांची १५ वी विधानसभा गठित करण्याची आणि...

November 25, 2024 2:33 PM November 25, 2024 2:33 PM

views 24

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. बहुमत मिळवणाऱ्या आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड एकमताने झाली.   राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड झाली. भाजपा विधिमंडळ पक्षाची नेता निवड अद्याप बाकी आहे. ती झाल्यावर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होईल...

November 24, 2024 3:17 PM November 24, 2024 3:17 PM

views 12

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही मतभेद नाहीत – एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते. त्यामुळे सत्तास्थापन करतानाही मतभेद नाहीत  असं शिंदे यांनी सांगितलं.

October 6, 2024 6:44 PM October 6, 2024 6:44 PM

views 27

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही,अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्वाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून विरोधकांनी अनेक प्रयत्न केले, मात्र ही योजना कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि विविध योजनांचा लोकार्पण सोहळा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महिलांच्या संसाराला हातभर लावण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना आणली, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने आतापर्यंत पिंक रिक्षा योजना, लेक लाडकी लखपती योजना, वयश्री योजना अशा अनेक लोककल्याण...

September 17, 2024 10:08 AM September 17, 2024 10:08 AM

views 25

जागतिक कृषी मंचातर्फे पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामाची दखल

जागतिक कृषी मंचातर्फे पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे. या कामगिरीसाठी उद्या जागतिक बांबू दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान केला जाणार आहे. मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाला 20 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण रक्षणासाठी त्वरीत कृतीची साद संयुक्त राष्ट्रांनी दिली होती. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिलाच देश ठरला असून महाराष्ट्...

July 14, 2024 8:14 PM July 14, 2024 8:14 PM

views 20

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या नियोजनाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेऊन सोई-सुविधांची पाहणी केली. वारीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या वर्षी पंढरपुरात स्वच्छता व्यवस्था चांगली आहे असं सांगून नदी स्वच्छता आणि वाळवंट स्वच्छतेबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी करकंब इथं श्री संत निळोबाराया पालखीचं दर्शन घेतलं आणि पालखीसोबत काही वेळ पायी प्रवास केला. या...

June 29, 2024 7:18 PM June 29, 2024 7:18 PM

views 10

सर्वधर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सर्वधर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं ते म्हणाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती.