June 5, 2025 9:35 AM June 5, 2025 9:35 AM

views 15

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात विशेष वृक्षारोपण मोहीम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत भगवान महावीर वनस्थळी उद्यानात होणाऱ्या विशेष वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होणार आहेत. एक पेड मां के नाम या उपक्रमाचा भाग म्हणून ही मोहीम होत आहे. अरावली हरित भिंत प्रकल्पाचा ती भाग आहे. सातशे किलोमीटरच्या अरावली पर्वतरांगांमध्ये पुनर्वनीकरणाचा तो भाग आहे.

September 18, 2024 1:27 PM September 18, 2024 1:27 PM

views 7

‘एक पेड़ माँ के नाम’ अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सात हजार झाडं लावली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनी सुरु केलेल्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आजपर्यंत सुमारे सात हजार झाडं लावली आहेत. देशभरातल्या शहरी आणि ग्रामीण मिळून विविध कार्यालयात हे अभियान राबवण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून अभियानात योगदान द्यायला सुरुवात केली. कालपासून सुरु झालेल्या स्वच्छता ही सेवा अभियानातही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कार्यालयांमधे वृक्षलागवडीचं काम हाती घेतलं आहे.

August 29, 2024 7:56 PM August 29, 2024 7:56 PM

views 11

मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतल्या भारतीय शेतकी संशोधन संस्थेत रोपं लावली

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतल्या भारतीय शेतकी संशोधन संस्थेत ‘एक पेड मॉ के नाम’ या अभियानाअंतर्गत रोपं लावली. या वेळी त्यांनी सुमारे एक एकर जागेवर मातृवन स्थापन करण्याची योजना असल्याचंही सांगितलं.

August 23, 2024 1:45 PM August 23, 2024 1:45 PM

views 14

‘एक पेड मां के नाम’ मोहिमेअंतर्गत आकाशवाणी भवन परिसरात वृक्षारोपण

यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड मां के नाम’ ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरात वृक्षारोपण मोहिमेत लोक उत्साहाने सहभागी होत आहेत. नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन परिसरात आज आकाशवाणीच्या महासंचालक मौसमी चक्रवर्ती आणि अतिरिक्त महासंचालक एल. मधु नाग यांनी वृक्षारोपण केलं. या मोहिमेत आकाशवाणीच्या अन्य अधिकाऱ्यांनाही सहभाग घेतला.

July 14, 2024 7:59 PM July 14, 2024 7:59 PM

views 16

इंदोर शहरात एक पेड माँ के नाम या अभियानाचा शुभारंभ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मध्यप्रदेशातल्या इंदोर शहरात एक पेड माँ के नाम या अभियानाचा शुभारंभ केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची घोषणा केल्यावर जनतेनं त्या आवाहनाला प्रतिसाद दिला असल्याचं शहा यावेळी म्हणाले. इंदोरची ओळख स्वच्छ शहराबरोबर हरित शहर अशी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. इंदोरनं एका दिवसात ११ लाख रोपांची  लागवड करून जागतिक विक्रम  केला  आहे.  दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी आज अन्य एका कार्यक्रमात  मध्यप्रदेशमधल्या  सर्व ५५ जिल्ह्यांतल्या  प्रधानमंत्री उत्कृ...