September 14, 2024 6:58 PM September 14, 2024 6:58 PM
6
‘ईद-ए-मिलाद’ची सार्वजनिक सुट्टी १६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी निर्गमित
ईद ए मिलाद म्हणजेच प्रेषित महंमदांच्या जयंती निमित्त अनेक ठिकाणी मुस्लीम समाजातर्फे जुलूस काढण्यात येतात. मात्र यंदा येत्या मंगळवारी १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून गणेशविसर्जनाची धामधूम लक्षात घेता सलोखा राखण्याच्या दृष्टीनं मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवारी १८ सप्टेंबरला जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १६ सप्टेंबरला घोषित केलेली ईद ए मिलादची सुटी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात १८ सप्टेंबरला देण्याचा निर्णय प्रशासनानं ...