June 6, 2025 7:26 PM June 6, 2025 7:26 PM
10
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नये यासाठी तस्करांना जेरबंद करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नये यासाठी तस्करांना जेरबंद करा, असे आदेश पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना दिले आहेत. नागपुरात जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत २३८ गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली आणि सुमारे २४ लाखांच्या मुद्देमालासह तस्करांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.