September 6, 2024 12:22 PM September 6, 2024 12:22 PM
14
राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने, 2024-25 या वर्षासाठी, राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना, अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांची आठव्या इयत्तेनंतर होणारी गळती रोखण्यासाठी आणि त्यांना त्यांचं शालेय शिक्षण 12वी पर्यन्त पूर्ण करण्यासाठी, प्रोत्साहनपर हेतूनं ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही योजना केवळ राज्य सरकार, सरकारी अनुद...