June 14, 2025 8:22 PM
39
परदेशातल्या पाच विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्रं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत प्रदान
संपूर्ण जग आज भारताकडे फक्त एक जागा म्हणून नाही, तर ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रातला भागीदार म्हणून बघत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केलं. पाच परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्रं या विद्यापीठांना आज देण्यात आली, या कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते. विकसित भारताच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा टप्पा असून शिक्षणामुळेच देशाचं भविष्य सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योजकता आणि ज्ञानाच्या क्षेत्रात आधीपासूनच आघाडीवर अ...