October 8, 2025 7:30 PM October 8, 2025 7:30 PM

views 86

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ!

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, यासोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज मंत्रालयात पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी आयोजित  बैठकीत बोलत होते.  

September 30, 2025 1:14 PM September 30, 2025 1:14 PM

views 28

SevaParv: शिक्षण क्षेत्रात सुधारणा

सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवा पर्व या मालिकेत आज आपण शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबद्दल जाणून घ्या...   मागील अकरा वर्षांमध्ये शाळांपासून विद्यापीठांपर्यंत शिक्षण व्यवस्थेला बळकटी आणण्याच्या बाबतीत भारताने वेगानं प्रगती केली आहे. निपुण भारत अभियान, पीएम श्री योजना, राष्ट्रीय  अभ्यासक्रम  धोरण, राष्ट्रीय क्रेडीट फ्रेमवर्क अशी पावलं उचलून शिक्षण व्यवस्थेमध्ये लवचिकता, बहुशाखीय ज्ञान आणि आंतरराष्...

June 22, 2025 7:12 PM June 22, 2025 7:12 PM

views 7

व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्यार्थिनींसाठी मोफत

व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्यार्थिनींसाठी मोफत असल्यानं त्यासाठी कोणतंही शुल्क आकारू नये, असे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थिनींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं आज बैठक झाली. यात मंत्री पाटील यांनी हे आदेश दिले. गेल्यावर्षी संस्थांनी शुल्क आकारलं असेल तर ते परत करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या. शुल्क आकारणीबाबतच्या समस्यांच्या निवारणासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने मदतक्रम...

June 20, 2025 6:26 PM June 20, 2025 6:26 PM

views 8

हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्याच्या हिताचं नाही – शरद पवार

हिंदी भाषेची सक्ती असू नये. पण, हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्याच्या हिताचं नाही, असं मत खासदार शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. राज्यात सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या वादावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, कोणाला स्वसंमतीनं हिंदी भाषा शिकायची असेल तर त्याला  नाही म्हणण्याचं कारण नाही. हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, असं पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे घटक पक्ष लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतील, असं...

June 18, 2025 7:48 PM June 18, 2025 7:48 PM

views 39

शाळांमध्ये हिंदी अनिवार्य ऐवजी वैकल्पिक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात सरकारने शुद्धीपत्रक जारी केलं. आता विद्यार्थ्यांना हिंदी ऐवजी इतर भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय असून, किमान २० विद्यार्थी इच्छुक असतील तर शिक्षक नियुक्ती किंवा ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करता येईल, असं या पत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचंही यात स्पष्ट केलं आह...

December 17, 2024 1:42 PM December 17, 2024 1:42 PM

views 8

देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध

देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांसाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल आज नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांना ते माहिती देत होते. सरकारने प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत १ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे, गेल्या आठ वर्षांत प्रति बालक खर्चात १३० टक्के वाढ झाली आहे.   वर्ष २०१३-१४ मध्ये १०,७८० रुपये असलेली ही रक्कम आता २०२१-२२ पर्यं...

December 7, 2024 11:04 AM December 7, 2024 11:04 AM

views 10

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग-राष्ट्रपतींचं प्रतिपादन

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ओडीशातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना केलं. केवळ 'रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण' हे ब्रीद न ठेवता, विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान संपादन केलं पाहिजे असं त्या पुढे म्हणाल्या. मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी काल संवाद साधला. देशातील मुली अधिक मेहनती आहेत आण...

October 24, 2024 2:34 PM October 24, 2024 2:34 PM

views 11

भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च, युनेस्कोच्या पाहणीचा निष्कर्ष

चीन किंवा जपानपेक्षा भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च करण्यात येतो असं युनेस्कोच्या पाहणीत आढळलं आहे. भारतात शिक्षणावरचा खासगी आणि सरकारी खर्च आशियातल्या इतर देशांपेक्षा जास्त असल्याचं युनेस्कोच्या अहवालात म्हटलं आहे. २०१५ ते २०२४ या काळात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या ४ पूर्णांक १ दशांश टक्के ते ४ पूर्णांक ६ दशांश टक्के खर्च भारतात करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी २०३० पर्यंतच्या कालावधीसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांमधे म्हटलंय की राष्ट्राच्य...

October 14, 2024 6:31 PM October 14, 2024 6:31 PM

views 10

राज्य सरकारनं शिक्षकांवरचा भार कमी केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचं स्थान अतिशय महत्त्वाचं असून आपल्या सरकारनं शिक्षकांवरचा भार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विजेत्या शाळांना त्यांच्या हस्ते आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्या कार्यक्रमात ते बोलत होते.   शालेय शिक्षणंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपलं सरकार फक्त बोलणारं नाही, तर काम करून दाखवणारं आहे, असं सांगून मुख्यमंत्री माझी ला...