September 13, 2024 3:04 PM September 13, 2024 3:04 PM

views 18

पश्चिम बंगालमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ईडीचे छापे

अन्न पुरवठा आणि वितरण भ्रष्टाचार प्रकरणी ईडी, अर्थात सक्तवसुली  संचालनालयानं आज पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मेदिनीपूर, दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, नादिया आणि कोलकाता यासह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. विविध गोदामं, रास्त भाव दुकाने आणि रेशन विक्रेत्यांच्या घरांची तपासणी सुरू आहे.

September 12, 2024 3:25 PM September 12, 2024 3:25 PM

views 17

उषदेव इंटरनॅशनलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

उषदेव इंटरनॅशनलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणी ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं ४३ कोटी ५२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात जमीन, वास्तू आणि बँक खात्यांमधल्या मुदत ठेवींचा समावेश आहे. १ हजार ४३८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या या फसवणूक प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. उषदेव इंटरनॅशनलनं अनेक बँकांकडून कर्ज म्हणून घेतलेली रक्कम इतर संस्थांना असुरक्षित कर्जाच्या स्वरुपात दिली, आणि शेवटी ती भारतातल्या कंपन्यांकडे गेल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं. या भारतातल्या कंपन्यांचे प्रमुख भागधारक उषद...

August 30, 2024 10:49 AM August 30, 2024 10:49 AM

views 13

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे देशभरात दहा ठिकाणी छापे

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं आखाती देशांतून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर जसमीत हकीमजादा प्रकरणी काल देशभरात दिल्ली, अमृतसर, जालंधर, मुंबई, सोलापूर आणि इंदूर अशा दहा ठिकाणी छापे टाकले. अमेरिकेच्या फॉरेन नार्कोटिक्स किंगपिन डेजिगेशन अॅक्टअंतर्गत 'महत्त्वपूर्ण परदेशी अंमली पदार्थ तस्कर' म्हणूनही त्याची नोंद आहे. पी एम एल ए कायद्यातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली. दुबईत राहणारा जसमीत भारतात अंमली पदार्थांचा व्यापार चालवत असल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे.

August 15, 2024 1:29 PM August 15, 2024 1:29 PM

views 15

सक्तवसुली संचालनालयाच्या पूर्णवेळ संचालकपदी राहुल नवीन यांची नियुक्ती

जेष्ठ महसुली अधिकारी राहुल नवीन यांची सक्तवसुली संचालनालयाच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीनं त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. सध्या राहुल नवीन हे इडीचे विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी नवी नियुक्ती २ वर्षांसाठी असेल.

July 20, 2024 8:37 PM July 20, 2024 8:37 PM

views 29

हरयाणाचे काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना ईडीकडून अटक

हरयाणामधले कॉँग्रेसचे आमदार सुरेंद्र पवार यांना आज सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यांच्यावर यमुनानगर भागात अवैध खाणकाम आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांना अंबाला जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सक्तवसुली संचालनालयाने १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

July 12, 2024 2:45 PM July 12, 2024 2:45 PM

views 12

मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने माजी मंत्री बी. नागेंद्र यांना चौकशीसाठी घेतले ताब्यात

कर्नाटकमधल्या महर्षि वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री बी नागेंद्र यांना सक्तवसुली संचालनालयानं आज  चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अनुसूचित जमाती विकास महामंडळातील १८७ कोटी रुपये बेकायदा हस्तांतरीत करण्यात आले. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये  २० ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आज माजी मंत्री बी नागेंद्र यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

June 14, 2024 2:23 PM June 14, 2024 2:23 PM

views 31

क्रिकेट मॅच आणि लोकसभा निडवणुकीत सट्टा लावल्याबद्दल मुंबईतल्या ऑनलाईन ॲपवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

आयपीएल क्रिकेट सामन्यांचं अनधिकृत प्रसारण केल्याबद्दल तसंच क्रिकेट सामने आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सट्टा लावल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयाने अर्थात इडीनं काल मुंबईतल्या ऑनलाईन ॲपवर छापे टाकले. या छाप्यात इडीनं रोख रक्कम, महागडी घड्याळं आणि डिमॅट खाती असे एकूण ८ कोटी रुपये जप्त केले आहेत.