January 8, 2026 1:41 PM January 8, 2026 1:41 PM
14
सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीवर EDचे छापे
ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने देशभरात सरकारी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या एका टोळीचा शोध सुरू केला असून, सहा राज्यांमधल्या १३ शहरांमध्ये जवळपास १५ ठिकाणांवर छापे टाकले. बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेशात हे छापे टाकण्यात आले. ही टोळी बनावट ईमेल खात्यांचा वापर करून तसंच अधिकृत सरकारी डोमेनची हुबेहूब नक्कल करून नोकरीचं बनावट पत्र पाठवत होती. यावर विश्वास बसावा यासाठी काही जणांना सुरुवातीचे दोन ते तीन महिने पगारही देण्यात आल्याचं ईडीने म्हटलं आहे. आधी हा घोटाळा भ...