November 18, 2025 1:16 PM

views 19

सक्तवसुली संचालनालयाची दिल्लीत २५ ठिकाणी शोधमोहिमा

सक्तवसुली संचालनालयानं आज दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अल फलाह समूहाशी संबंधित २५ ठिकाणी शोधमोहिमा राबवल्या. आर्थिक अनियमितता, बनावट कंपन्यांचा वापर यासह इतर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.   सध्या अल फलाह समूहाशी संबंधित असलेल्या आणि एकाच पत्त्यावर नोंद असलेल्या नऊ बनावट कंपन्यांचा तपास सुरू असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयानं दिली.   दिल्लीत लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटानंतर अटक करण्यात आलेल्या अनेक डॉक्टरांचा अल फलाह विद्यापीठाशी संबंध असल्याचं समोर आ...

November 3, 2025 3:40 PM

views 47

उद्योजक अनिल अंबानी यांच्यावर ईडीची कारवाई

उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबधित तीन हजार कोटी रुपयांच्या चाळीसहून अधिक मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने जप्त केल्या आहेत. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी इथं या मालमत्ता आहेत. अनिल अंबानी यांच्यावरील कर्ज घोटाळा आणि मनि लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

August 22, 2025 1:24 PM

views 9

जम्मूत विविध ठिकाणी ईडीचे छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज जम्मूत विविध ठिकाणी छापे टाकले. यात प्रामुख्यानं भूमी कांड संबंधातल्या महसूल अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा आणि कार्यालयांचा समावेश आहे. त्यात बेकायदेशीर व्यवहारांशी संबंधित असलेली कागदपत्रे आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त केले गेल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. कर चुकविणं आणि अनियमित उत्पन्न याबाबत संशय असलेल्या अहवालांनुसार हे छापे टाकण्यात आले.

August 13, 2025 8:26 PM

views 12

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ईडीकडून अटक

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ईडीनं आज अटक केली. त्यांच्यासह शहराचे माजी नगर नियोजक वाय. एस. रेड्डी आणि इतर दोघांनाही ईडीनं अटक केली. काही दिवसांपूर्वी ईडीनं या सर्वांवर धाड टाकली होती आणि त्यांची चौकशी केली होती. अवैध बांधकामांना परवानगी देण्यासाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

July 21, 2025 7:58 PM

views 9

समाज माध्यमांवर बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ॲपची जाहिरातप्रकरणी ईडीचे समन्स

विविध समाज माध्यमांवर बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ॲपची जाहिरात केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज अभिनेता प्रकाश राज, राणा दुग्गुबाती, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेकजणांना  चौकशीसाठी समन्स पाठवलं.     राणा दुग्गुबाती याला २३ जुलैला.प्रकाश राज यांना ३० जुलैला, विजय देवरकोंडाला  ६ ऑगस्टला तर लक्ष्मी मांचू ला १२ ऑगस्टला चौकशीसाठी बोलवलं आहे. अवैधरित्या सट्टेबाजी करणाऱ्या अॅप विरोधात तसंच त्यांची जाहिरात करणाऱ्यांविरोधात ईडीनं गुन्हे दाखल करत कठोर कारवाई सुरू केली आहे.

July 4, 2025 2:40 PM

views 14

ईडीने झारखंडमध्ये हजारीबाग आणि रांचीमधल्या आठ ठिकाणांवर टाकले छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने आज झारखंडमध्ये हजारीबाग आणि रांचीमधल्या आठ ठिकाणांवर छापे टाकले. झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपांच्या चौकशीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. खंडणी, बेकायदेशीर वाळू उत्खनन, जमीन हस्तांतरण अशा विविध प्रकारच्या आरोपांचा त्यात समावेश आहे.

June 6, 2025 5:44 PM

views 15

मुंबईतल्या मिठी नदीच्या गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मुंबई आणि केरळच्या कोची इथं १५ हून अधिक ठिकाणी टाकले छापे

मुंबईतल्या मिठी नदीच्या गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबई आणि केरळच्या कोची इथं १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये बॉलीवूड अभिनेता दिनो मोरिया, महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या घरांचा समावेश आहे. मिठी नदीच्या गाळ उपसा घोटाळ्यात मुंबई महानगरपालिकेला ६५ कोटीं रुपयांचं नुकसान झालं असून त्याची पीएमएलए कायद्यांर्गत चौकशी सुरू आहे.

May 8, 2025 3:12 PM

views 16

ED चे गैरव्यवहार प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या ९ ठिकाणी छापे

सक्त वसुली संचालनालयानं ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणांमध्ये बनावट जीएसटी इनव्हॉइसशी संबधित चौकशीसाठी कलकत्ता, रांची आणि जमशेदपूर इथल्या नऊ ठिकाणी छापे टाकले आहेत. अंदाजे १४ हजार ३२५ कोटी रूपयांचे बनावट इनव्हॉइस तयार केल्यामुळं आठशे कोटी रूपयांपेक्षा जास्त इनपुट टॅक्स क्रेडिटचे दावे अपात्र ठरल्याची माहिती संचालन विभागानं दिली आहे.   मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेशी संबधित कागदपत्रं आणि मालमत्ता उघड करणं हे या कारवाईचं उद्दिष्ट असल्याचं त्...

April 17, 2025 2:26 PM

views 14

ईडीने सलग तिसऱ्या दिवशी रॉबर्ट वाड्रा यांची केली चौकशी

सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं आज काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली. हरियाणातल्या जमीन व्यवहारातल्या अनियमितते संदर्भात ही चौकशी सुरु असल्याचं ईडीने म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या ईडीच्या कार्यालयात ही चौकशी सुरु आहे.

April 16, 2025 1:27 PM

views 17

हैद्राबादमध्ये मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीची कारवाई

मनी लाँडरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आज हैद्राबादमध्ये अनेक ठिकाणी कारवाई करत आहे. सुराणा समूह आणि साई सूर्या विकासकांशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात येत आहेत. प्रकल्पांची कामं वेळेवर पूर्ण करुन ताबा देण्यात अपयश आल्याबद्दल या उद्योजकांविरुद्ध गुन्हे नोंदण्यात आले आहेत.